
71 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची शुक्रवार, 1 ऑगस्ट रोजी घोषणा झाली. बॉलीवूड अभिनेत्री राणी मुखर्जीला आपल्या 30 वर्षांच्या कारकीर्दीत पहिल्यांदाच राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले. राणी मुखर्जीला ‘मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे’ चित्रपटासाठी सर्वोत्पृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. पुरस्कार मिळाल्यानंतर राणी मुखर्जीने सिद्धिविनायकाचे आशीर्वाद घेतले. 2023 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मिसेस चॅटर्जी विरुद्ध नॉर्वे’ या चित्रपटात राणी मुखर्जीने देबिका चॅटर्जी ही भूमिका साकारली होती. हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे. ज्यात आपल्या मुलांसाठी आईच्या संघर्षाची कथा मांडली होती. प्रेक्षकांनी आणि समीक्षकांनी या चित्रपटाला गौरवले.