
लाचप्रकरणी सीमा शुल्क विभागाच्या (कन्साइनमेंट क्लिअरन्स) अधीक्षकाला सीबीआयने अटक केली. एजंटकडून 10 लाख 20 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. सहार येथे एअर कार्गो कॉम्प्लेस आहे. तेथे कन्साइनमेंट क्लिअरन्सची सुविधा आहे. ती सुविधा सुलभ करण्यासाठी एजंट फर्मकडून 10 लाख 20 हजार रुपयांची लाच मागितली. तसेच आयात केलेल्या मालाच्या प्रती किलो 10 रुपये दराने लाचेची मागणी केली गेली होती.