
1 पद, 2 आदेश, 2 नेते, हे डबल इंजिन सरकार की डबल गँगवॉर? अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महायुतीवर केली आहे. X वर एक पोस्ट करत त्यांनी ही टीका केली आहे.
महायुती सरकारने एकाच पदाकरता एकाच दिवशी दोन विभागाकडून दोन वेगवेगळे आदेश काढले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बेस्टचा अतिरिक्त कार्यभार अश्विनी जोशी यांच्याकडे सुपूर्द केला. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खात्याकडून आशिष शर्मा यांची त्याच पदावर नेमणूक केली. यावरूनच हर्षवर्धन सपकाळ यांनी ही टीका केली आहे.
X वर केलेल्या आपल्या पोस्टमध्ये हर्षवर्धन सपकाळ म्हणाले आहेत की, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे च्यात अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून गॅंगवार सुरु आहे. एका पदासाठी एका दिवशी दोन वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या जात आहे. मलाईदार पदावर माणसे बसविण्यासाठी सुरु असलेला हा संघर्ष पाहता सरकार सुरु आहे की, टोळीयुद्ध? असा प्रश्न जनतेला पडला आहे.”