भाजप खासदारासह 2 जणांविरोधात गुन्हा दाखल…जाणून घ्या काय आहे प्रकरण…

कर्नाटकात भाजप खासदार आणि इतर 2 जणांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप खासदार के. सुधाकर यांच्यावर एका वाहनचालकाच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. वाहनचालक एम. बाबू यांनी गुरुवारी सकाळी आत्महत्या कली. त्यानंतर त्यांची पत्नी शिल्पा यांनी बाबू यांनी मृत्यूपुर्वी लिहिलेल्या चिठ्ठीच्या आधारे पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर भाजप खासदार के. सुधाकर यांच्यासह दोन जणावंर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाबू यांच्या मृत्यूमुळे आपल्याला खूप दुःख झाले आहे. मात्र, त्यांच्या मृत्यूशी आपला संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

कर्नाटकातील चिक्काबल्लापूर येथे आत्महत्या करण्यापूर्वी चालकाने भाजप खासदार के. सुधाकर आणि इतर दोघांचे नाव मृत्यूपुर्वी एका चिठ्ठीत लिहिले आहे. त्याआधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गुरुवारी सकाळी ड्रायव्हर एम बाबूने आत्महत्या करत जीवन संपवले. त्यानंतर त्यांची पत्नी शिल्पा हिने बाबू यांच्या चिठ्ठीच्या आधारे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

प्रथमदर्शनी अहवालात (एफआयआर) सुधाकर आणि इतर दोघे, नागेश आणि मंजुनाथ यांच्यावर बीएनएस आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्याअंतर्गत आर्थिक फसवणूक, आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि अत्याचार केल्याचा आरोप आहे. चिठ्ठीत बाबू यांनी सुधाकर आणि नागेश यांनी नोकरीचे आश्वासन देत 25 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप केला. जिल्हा परिषदेच्या एका अकाउंट असिस्टंटवरही त्याने आत्महत्या करण्यास भाग पाडल्याचा आरोप केला.
पोलिसांनी सांगितले की बाबू सहा वर्षांहून अधिक काळ जिल्हा पंचायतीत मुख्य लेखा अधिकाऱ्यांकडे कंत्राटी चालक म्हणून काम करत होता.