दादा म्हणाले, पुण्यात 3 नव्या महापालिका हव्यात; फडणवीस म्हणतात एकच हवी; महायुतीत ताळमेळ जुळेना

पुण्याचा वाढता विस्तार लक्षात घेता आगामी काळात पुणे जिह्यात चाकण परिसर, हिंजवडी आणि मांजरी-फुरसुंगी-उरळी देवाची अशा तीन नव्या महापालिका करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याची मोठी घोषणा उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी सकाळी केली. मात्र, अवघ्या अडीच तासातच पुणे दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री फडणवीस यांनी सध्या एकाच महापालिकेची गरज असल्याचे सांगितले. त्यामुळे महायुतीत ताळमेळ नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ असलेले बंडगार्डन पोलीस ठाणे स्थलांतर करा, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस महासंचालकांना सांगितले होते. मात्र अजूनही काम झाले नाही. ते काम वर गेल्याचे पोलीस महासंचालकांनी मला सांगितले. चहल मला परत सांगायला लावू नका, माझी विनंती आहे, असे दादांनी गृह विभागाचे अपर मुख्य सचिव इक्बाल सिंह चहल यांना सुनावले.

कुठणं या पुण्याचा पालकमंत्री झालो! कोणीही उठतो, उपदेश पाजतो; अजित पवार यांची हतबलता