सोने पाच दिवसांत 5800 रुपयांनी महागले

सराफा बाजारात सोन्याचे भाव प्रचंड वाढत चालले आहेत. सोन्याच्या किमतीत अवघ्या पाच दिवसांत 5 हजार 800 रुपयांची वाढ झाली आहे. 10 ग्रॅम सोन्यासाठी आता 1 लाख 3 हजार 430 रुपये मोजावे लागत आहेत. गुरुवारी 3 हजार 600 रुपये तर शुक्रवारी 800 रुपयांनी सोने महागले होते. सोन्यापाठोपाठ चांदीच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. चांदी प्रतिकिलो 1 लाख 15 हजार रुपयांपर्यंत पोहोचली. शुक्रवारी चांदीच्या दरात 1 हजार रुपयांची वाढ झाली. चांदीचा भाव पाच दिवसांत 5 हजार 500 रुपयांनी वाढला आहे.