एसएससी-सीजीएलची परीक्षा स्थगित

स्टाफ सिलेक्शन कमिशन (एसएससी) अंतर्गत 13 ऑगस्टपासून सुरू होणारी एसएससीची कंबाइंड ग्रेजुएट लेव्हल (सीजीएल)ची परीक्षा स्थगित करण्यात आली आहे. ही परीक्षा आता सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात घेतली जाणार आहे. एसएससीच्या ऑनलाइन परीक्षेतील डेटामध्ये आलेल्या तांत्रिक बिघाडामुळे ही परीक्षा स्थगित करण्यात आली आहे. या तांत्रिक बिघाडावरून देशभरातील विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. तसेच वेबसाईटच्या सर्व्हरमध्ये बिघाड, स्वाक्षरी सेंटर न मिळणे, अचानक परीक्षा रद्द होणे यासारख्या समस्या विद्यार्थ्यांना येत होत्या. अनेक विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.