निवडणूक आयोगाने देशातली मुक्त आणि निष्पक्ष निवडणूक उद्ध्वस्त केली आहे, आदित्य ठाकरे यांची टीका

निवडणूक आयोगाकडून विरोधी पक्षांच्या नेत्यांना धमकावण्याचा प्रकार लज्जास्पद आहे अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, आमदार आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केली. तसेच निवडणूक आयोगाने देशातली मुक्त आणि निष्पक्ष निवडणूक उद्ध्वस्त केली असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, संपूर्ण जग पाहत आहे की निवडणूक आयोगाने भारतातील मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका कशा उद्ध्वस्त केल्या आहेत. विरोधी पक्षांच्या नेत्यांना धमकावण्याचा आयोगाचा प्रकार लज्जास्पद आहे. निवडणूक आयोगाने स्पष्टपणे भूमिका मांडून राहुल गांधींच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत. निवडणूक आयोग स्वतःला सर्वोच्च न्यायालयापेक्षा वरचं मानत आहे. सर्वोच्च न्यायालयातसुद्धा त्यांनी असे म्हटले आहे की, बिहारमधून ज्या व्यक्तींची नावे वगळण्यात आली आहेत, त्यांची यादी ते सादर करणार नाहीत. मग त्यांना मतदानाचा हक्क नाही काय? असा सवालही आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला.