युद्ध सुरू असताना 6 हजार हिंदुस्थानी कामगार रोजगारासाठी इस्रायलमध्ये

इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेला संघर्ष दिवसेंदिवस चिघळत असताना हिंदुस्थानातून तब्बल सहा हजार 774 कामगार इस्रायलमध्ये रोजगारासाठी गेले. हिंदुस्थान आणि इस्रायलमध्ये नोव्हेंबर 2023 मध्ये झालेल्या द्विपक्षीय करारानुसार हे कामगार रोजगाराच्या शोधात गेले आहेत.

सरकारनेच ही माहिती दिली आहे. त्यांची आम्ही योग्य ती काळजी घेत आहोत, असेही सरकारने म्हटले आहे. 6 हजार 730 कामगार हे बांधकाम क्षेत्रात काम करत असून 220 कामगार हिंदुस्थानात परतले आहेत. काwशल्याचा अभाव-भाषेची अडचण म्हणून या कामगारांना परतावे लागले. 44 हिंदुस्थानी कामगार देखभालकर्ता म्हणून कार्यरत आहेत.

अनेक हिंदुस्थानी जखमी

इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्षाच्या काळात मार्च 2024 मध्ये लेबनॉनकडून झालेल्या हल्ल्यात एका हिंदुस्थानी पृषी कामगाराचा मृत्यू झाला, तर ऑक्टोबर 2023 रोजी गाझातून झालेल्या रॉकेट हल्ल्यात तीन हिंदुस्थानी जखमी झाले आणि
2 मार्च 2024 रोजी लेबॉननच्या हल्ल्यात आणखी दोन हिंदुस्थानी जखमी झाले.

कोणत्या देशात किती कामगार

सौदी अरेबिया  2,00,713

यूएई           71,687

पुवेत           48,212

रशिया         37,090

इतर देश      66,000

n 2022 मध्ये हिंदुस्थान आणि इस्रायल यांच्यात हिंदुस्थानी नागरिकांना नेण्यासाठी चर्चा सुरू झाली. याचअंतर्गत नोव्हेंबर 2023 मध्ये स्वाक्षऱ्या झाल्या होत्या.