
भिवंडीच्या अंजुरगाव येथून ठाण्यातील घोडबंदरच्या दिशेने 15 टन सिमेंट घेऊन जाणारा मिक्सर खारेगाव टोलनाक्यावर आज सकाळी पलटी झाला. या अपघातामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र नाशिक-मुंबई महामार्ग तब्बल दोन तास रोखला गेला. खारेगाव टोलनाक्याजवळ असलेल्या दुभाजकाला सिमेंट मिक्सर धडकला आणि अपघात झाला. अपघातामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
सिमेंट मिक्सरचालक अरविंद गुप्ता आज भिवंडी अंजुरगाव येथून 15 टन सिमेंट काँक्रीट घेऊन ठाणे घोडबंदर रोड येथे निघाला होता. नाशिक- मुंबई महामार्गावरील खारेगाव टोलनाक्याजवळ आल्यावर चाल क गुप्ता याचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी रस्त्याच्या दुभाजकाल 1 जाऊन धडकून जागीच उलटली. या अपघाताची माहिती वाहतूक पोल ीस कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाला मिळताच घटनास्थळी यंत्रणेने धाव घेतली. वाहतूक खोळंबल्याने अपघातग्रस्त सिमेंट मिक्सर क्रेन मशीनच्या सहाय्याने बाजूला करण्यात आला आहे.
रोज मरे त्याला..
मुंबई-नाशिक महामार्गावर रुंदीकरणाचे काम सध्या सुरू असल्याने रोजच वाहनचालकांना कोंडीला सामोरे जावे लागते. त्यामुळे या मार्गाची अवस्था रोज मरे त्याला कोण रडे अशी झाली आहे.