म्हाडाच्या 5285 घरांच्या सोडतीला मुदतवाढ, इच्छुकांना 28 ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार 18 सप्टेंबरला ठाण्यात संगणकीय सोडत

म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 5285 घरांच्या सोडतीला तसेच सिंधुदुर्ग जिह्यातील ओरोस, कुळगाव-बदलापूर येथील 77 भूखंडांच्या विक्रीला आता 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे इच्छुकांना आता 28 ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्ज आणि 29 ऑगस्टपर्यंत पैसे भरता येतील. संगणकीय सोडत 3 सप्टेंबरऐवजी आता 18 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता ठाण्यातील डॉ. काशीनाथ घाणेकर नाटय़गृहात पार पडणार आहे.

कोकण मंडळाच्या या सोडतीत ठाणे, डोंबिवली, कल्याण, टिटवाळा, नवी मुंबई अशा विविध लोकेशनवर ही घरे असून 9.50 लाखांपासून ते 85 लाखांपर्यंतच्या घरांच्या किमती आहेत. मुदतवाढ दिल्यामुळे इच्छुक अर्जदारांची संख्या वाढेल, असे म्हाडाचे म्हणणे आहे. 5285 घरांसाठी सोमवारी सायंकाळपर्यंत 67 हजार 539 अर्ज आले असून 40 हजार 998 जणांनी अनामत रक्कमदेखील भरली आहे.