
कडधान्यांना लवकर मोड आणण्यासाठी सर्वात आधी कडधान्ये स्वच्छ धुऊन घ्या. मग ती 8 ते 10 तास पाण्यात भिजत ठेवा. भिजवलेली कडधान्ये एका भांडय़ात ठेवून त्यावर ओल्या कपड्याने झाकून ठेवा. दोन ते तीन दिवसांत चांगले मोड येतील.
मोड येण्यासाठी कडधान्ये हवेशीर ठिकाणी ठेवा. जास्त वेळ पाण्यात ठेवल्यास किंवा जास्त पाणी घातल्यास कडधान्ये चिकट होण्याची शक्यता असते.थोडेसे पाणी शिंपडून ओलसर ठेवावे. थंडीच्या दिवसात मोड येण्यासाठी जास्त वेळ लागू शकतो. त्यामुळे कडधान्ये थोडी गरम ठिकाणी ठेवा. रोज कडधान्यांची तपासणी करत रहा. जर पाणी कमी असेल, तर थोडेसे पाणी शिंपडून ओल्या कपड्याने झाकून ठेवा.