दहीहंडीच्या सरावादरम्यान सहाव्या थरावरून पडून लहानग्याचा मृत्यू  

दहीहंडीच्या सरावादरम्यान सहाव्या थरावरून पडून 11 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना दहिसरच्या केतकीपाडा परिसरात घडली. महेश जाधव असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी दहिसर पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. रात्री उशिरा पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. रविवारी रात्री केतकी पाडा येथे नवतरुण मित्र मंडळाचे बाळ गोपाळ हे सराव करत होते. सराव करताना महेश हा सहाव्या थरावर गेला. हंडी पकडण्याच्या प्रयत्नात तो तोल जावून खाली पडला. त्याला उपचारासाठी दहिसर पूर्व येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले असता, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.