
एकीकडे दिग्गज खेळाडू निवृत्त होत असताना टीम इंडियाला स्ट्राँग करण्यासाठी बीसीसीआयने आपल्या तरुण पिढीवर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे मिसरूडही न फुटलेल्या 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीला बंगळुरूच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये विशेष प्रशिक्षण दिले जात आहे. आयपीएल आणि इंग्लंड दौऱयावरील 19 वर्षांखालील संघातील अफलातून कामगिरामुळे वैभव सूर्यवंशी नावाप्रमाणे तळपू लागला आहे.
सध्या बीसीसीआयचे मुख्य लक्ष आशिया कपवर असले तरी वैभवला दिले जाणारे हे प्रशिक्षण भविष्यातील राष्ट्रीय संघासाठी त्याला घडवण्यासाठी आहे. 14 वर्षीय वैभवने ‘आयपीएल’च्या इतिहासातील दुसऱया क्रमांकाचे जलद शतक झळकावले होते आणि तो हिंदुस्थानसाठी या लीगमध्ये सर्वात जलद शतक करणारा फलंदाज ठरला. त्यानंतर इंग्लंड दौऱयावरही त्याने उत्पृष्ट खेळ केला. इंग्लंडहून परतल्यानंतर राजस्थान रॉयल्सने त्याला विशेष सराव सत्रासाठी बोलावले होते. तिथूनच 10 ऑगस्ट रोजी तो थेट बंगळुरूमधील ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’मध्ये दाखल झाला. इथे त्याच्यासाठी सामन्यांच्या विशिष्ट परिस्थिती आणि तांत्रिक काwशल्यांचा विचार करून विशेष प्रशिक्षण योजना तयार करण्यात आली आहे.
सप्टेंबरमध्ये ऑस्ट्रेलिया दौरा
हिंदुस्थानचा 19 वर्षांखालील संघ सप्टेंबरमध्ये ऑस्ट्रेलिया दौऱयावर जाणार आहे. या दौऱयात हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 3 वन डे आणि 2 कसोटी सामने होतील. वैभवची या दौऱयासाठी संघात निवड झाली आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी हिंदुस्थानचा 19 वर्षांखालील संघ ः आयुष म्हात्रे (कर्णधार), विहान मल्होत्रा (उपकर्णधार), वैभव सूर्यवंशी, वेदांत त्रिवेदी, राहुल कुमार, अभिज्ञान पुंडू (यष्टिरक्षक), हरवंश सिंग (यष्टिरक्षक), आर. एस. अंबरीश, कनिष्क चौहान, नमन पुष्पक, हेनिल पटेल, डी. दीपेश, किशन पुमार, अनमोलजीत सिंह, खिलान पटेल, उधव मोहन, अमन चौहान. राखीव खेळाडू ः युद्धजीत गुहा, लक्ष्मण, बी. के. किशोर, अलंकृत रापोले, अर्णव बुग्गा.