
निवडणूक आयोगाची भूमिका संशयास्पद असून निवडणुकीत भाजपच्या पदरी अपयश येते तिथे लोकशाहीचा खून करण्याचा प्रयत्न सातत्याने होत आहे. भाजप सरकार सत्तेवर असेपर्यंत देशात खरी लोकशाही सुरक्षित राहणार नाही, असा आरोप काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांची केला.
राज्यातील सरकार हे जनतेने निवडून दिलेले सरकार नसून निवडणूक आयोगाने निवडून दिले आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी आयोगाच्या कार्यपद्धती बाबतीत उपस्थित केलेला मुद्दा काँग्रेस पक्षासाठी किंवा आघाडीसाठी उपस्थित केला नाही तर तो संपूर्ण देशहितासाठी आणि येथील लोकशाही वाचवण्यासाठीच आहे असे चेन्नीथला म्हणाले. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ उपस्थित होते.