बबिता पवार यांचा शिवसेनेत प्रवेश

दि बेस्ट एम्प्लॉईज को-ऑप. व्रेडिट सोसायटी लिमिटेडच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेस्ट कामगार सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण बेस्ट कामगार कर्मचारी सेनेचा कार्यकर्ता मेळावा भांडुपमध्ये पार पडला. या मेळाव्यात बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत आणि शिवसेना विभागप्रमुख, माजी आमदार रमेश कोरगावकर यांच्या उपस्थितीत बबिता अजित पवार यांनी शिवसेनेत प्रवेश केला. बबिता पवार 20 वर्षांपासून बेस्ट कामगार सेनेशी एकनिष्ठ राहिल्या, मात्र काही असंतुष्ट लोकांनी बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या तोंडावर वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न केला. बबिता पवार यांच्या शिवसेना प्रवेशामुळे असंतुष्ट लोकांच्या षड्यंत्राला मोठा धक्का बसला आहे, अशी प्रतिक्रिया बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी दिली.