
काँग्रेस पक्षाने मतचोरी आणि निवडणूक प्रक्रियेतील गैरप्रकारांविरोधात आवाज उठवत एक व्हिडीओ जारी केला आहे. मतचोरीच्या दाव्यामुळे या व्हिडीओचे शीर्षक ‘लापता वोट’ असे ठेवण्यात आले आहे. या व्हिडीओचे शीर्षक अलीकडील ‘लापता लेडीज’ चित्रपटापासून प्रेरित आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही हा व्हिडीओ शेअर करत म्हटले आहे की, “चोरी चोरी, चुपके चुपके… जनता आता जागृत झाली आहे आणि अशा प्रकारच्या गैरप्रकारांना ती सहन करणार नाही.”
हा व्हिडीओ काँग्रेसने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडल्सवर प्रसिद्ध केला असून, त्यात मतदान प्रक्रियेत गडबड आणि मतदारांच्या मतांचा गैरवापर कसा होतो, यावर तपशीलवार माहिती देण्यात आली आहे. राहुल गांधी यांनी या व्हिडीओद्वारे जनतेला आवाहन केले आहे की, ते आपल्या मताधिकाराबाबत सजग राहावे आणि निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता असावी, यासाठी दबाव निर्माण करावा.
आपके वोट की चोरी
अधिकार की चोरी हैआइए साथ मिलकर वोट चोरी के खिलाफ आवाज उठाएं, अपने अधिकार को बचाएं.#StopVoteChori pic.twitter.com/VRxuydPW6k
— Congress (@INCIndia) August 16, 2025