इन्स्टाग्राम आणणार नवीन ’पिक्स’ फिचर

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्राम आपल्या युजर्ससाठी लवकरच पिक्स नावाचे नवीन फिचर आणणार आहे. हे फिचर आल्यानंतर युजर्सला त्यांना त्यांची पसंतीचे चित्रपट, पुस्तके, टीव्ही शो, गेम आणि संगीत निवडण्याचे पर्याय देईल. यामुळे युजर्सला आपले पसंतीच्या मित्रमंडळींना जोडता येईल. पिक्स फिचरमुळे इन्स्टाग्रामवर युजर्सला मित्र शोधण्यात मदत होईल.