चीनचे विदेश मंत्री हिंदुस्थान दौऱ्यावर

चीनचे विदेशमंत्री वांग यी हे सोमवारपासून दोन दिवसांच्या हिंदुस्थान दौऱयावर येणार आहेत. वांग यी यांचा हिंदुस्थान दौरा हा भारत-चीन सीमेच्या मुद्दय़ावर दोन्ही देशातील विशेष प्रतिनिधींमध्ये 24 वी बैठक होईल. चीनकडून वांग यी आणि हिंदुस्थानकडून राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे या बैठकीत सहभागी होतील. चीनच्या विदेश मंत्रालयाने वांग यी यांच्या हिंदुस्थान दौऱयाची माहिती दिली.