
रशियामध्ये व्हॉट्सअॅप आणि टेलिग्राम कॉलवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. रशियात टेलिग्राम आणि व्हॉट्सअॅपचा वापर फसवणूक करण्यासाठी, वसुली करण्यासाठी, दहशतवादी कारवायासाठी आणि रशियन नागरिकांची दिशाभूल करण्यासाठी केला जात आहे, त्यामुळे यावर बंदी घातली जात आहे, असे रशियन प्रशासनाकडून सांगण्यात आले. लॉ इनफोर्समेंट एजन्सी आणि सर्वसामान्य नागरिकांकडून सातत्याने यासंबंधी तक्रारी मिळत होत्या, असेही रशियन प्रशासनाने म्हटले आहे. या दोन्ही कंपन्यांनी संबंधितांवर कडक कारवाई करावी, असे सांगूनही दुर्लक्ष केल्याने हा निर्णय घेतला आहे.