
गेली 100 वर्षे व्यायाम आणि शारीरिक शिक्षण क्षेत्रात सक्रिय असलेल्या श्री समर्थ व्यायाम मंदिराचे 37 वे ज्युडो प्रशिक्षण शिबीर 18 ते 25 ऑगस्टदरम्यान छत्रपती शिवाजी महाराज पार्क आयोजित करण्यात आले आहे.
संध्याकाळी 7 ते 8 या वेळात शिबिरार्थीना ज्युडो या खेळांच्या मुलभूत कुवतींचे प्रशिक्षण तसेच शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या प्रशिक्षण या शिबिरात दिले जाणार आहे. या शिबिराचे संपूर्ण मार्गदर्शन सेन्साई रवींद्र पाटील यांच्या उपस्थितीत होणार आहे. सेन्साई पाटील हे ब्लॅक बेल्टची सातवी पिट्टी मिळविणारे हिंदुस्थानातील पहिले आंतरराष्ट्रीय रेफ्री आहेत. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली सलग आठ दिवस हे शिबीर चालणार आहे. शिबिरातील सहभागीसाठी इच्छुकांना व्यायाम मंदिरातील कार्यालयाशी थेट संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पहिल्या 100 शिबिरार्थींनाच या शिबिरात सहभागी होता येणार आहे.