
नेवासे फाटा रोडवरील आहिल्यानगर परिसरातील कालिका फर्नीचर या दुकानाला लागलेल्या आगीत 5 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 2 महिला व एक पुरूष व दोन लहान मुलांचा समावेश आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून रात्री आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळाले आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्यांचे मृतदेह नागरिकांच्या मदतीन बाहेर काढून ग्रामीण रुग्णालय येथे पहाटे पोलिसांनी पाठवीण्यात आले असल्याचे सांगितले आहे.
हे सुमारे ५००० स्के फूट आकाराचे पुर्णतः भिंती व छत हे पत्र्यांनी बनवलेले आहे .गोडावूनमध्ये सोफा, दिवान, खुर्ची, कूलर,फ्रिज,सोकेश,रैक, टिव्ही, वॉशिंग मशीन,असे फर्नीचर होते सदर गोडावूनमध्ये घरूपयोगी महागड़े वस्तू होत्या.सदरची आग ही 2 तासांचे प्रयत्नाने विझवण्यात आली. त्यासाठी आग्निशामन वाहने रूग्नवाहीका यांनी तत्परतेने प्रतिसाद दिल्याने गोडावून लगत असणारी मजली इमारतीत असणारे नागरीकांना व सदर इमारतीस कोणताही धोका पोहचला नाही.
ज्या कालिका फर्निचर दुकानाला आग लागलेली आहे. दुकानाच्या वरच्या मजल्यावर मयूर रासणे हे त्यांच्या पत्नी दोन्ही मुलासह व आई वडील इथेच राहतात आई व वडील बाहेरगावी गेले होते या घटनेत आई वडील सोडून मयूर रासने यांचे सर्व कुटुंब बळी गेले आहे . मयूर अरुण रासने वय ४० वर्ष, पायल मयूर रासने वय ३६वर्ष, अंश मयूर रासने वय १० वर्ष, चैतन्य मयूर रासने वय ६ वर्ष, एक वयोवृध महिला अंदाजे वय ७० वर्ष यांचा मृतांमध्ये समावेश आहे. तर यश किरण रासने वय २५ वर्ष हे जखमी झाले आहेत.