आशिया कपसाठी वैभव सूर्यवंशीला संघात घ्या! श्रीकांत यांची बीसीसीआयच्या निवड समितीकडे मागणी

जेव्हा असामान्य प्रतिभा आणि दमदार फॉर्म दिसतो तेव्हा वय अडथळा ठरू नये. त्याला आणखी वाट पाहायला लावू नका, अशा शब्दांत वैभव सूर्यवंशीचे काwतुक करत त्याला आशिया कपमध्ये खेळवावे, असे आवाहन माजी धडाकेबाज सलामीवीर आणि मुख्य निवड समिती सदस्य कृष्णम्माचारी श्रीकांत यांनी निवड समितीला केलेय.

आपल्या घणाघाती फलंदाजीने आधी आयपीएल आणि नंतर 19 वर्षांखालील हिंदुस्थानी संघाचा इंग्लंड दौरा गाजवणाऱया 14 वर्षीय आक्रमक फलंदाज वैभव सूर्यवंशीने अल्पावधीतच अवघ्या क्रिकेट विश्वाचे लक्ष वेधलेय. आता निवड समितीला त्याच्या नावाचा विचार करण्यास श्रीकांत यांनी भाग पाडले आहे. मंगळवारी अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखाली निवड समितीची बैठक मुंबईत होतेय. यात 9 ते 28 सप्टेंबरदरम्यान यूएईत होणाऱया टी-20 आशिया कपसाठी हिंदुस्थानी संघाच्या यादीवर शेवटचा हात फिरवून अंतिम संघ जाहीर केला जाणार आहे.

या निवडीसाठी किमान 25 खेळाडू निवड प्रक्रियेत रडारवर असून त्यापैकी केवळ 17 खेळाडूंची निवड करण्याचे धाडस निवड समितीला करावे लागणार आहे. त्यातच आता सूर्यवंशीनेही एण्ट्री केली आहे. एकीकडे श्रेयस अय्यर, रिंकू सिंग, जितेश शर्मा आणि रियान पराग यांच्यासारख्या खेळाडूंना संधीची प्रतीक्षा आहे. दुसरीकडे सूर्यवंशी मॅच्युअर्ड फलंदाजासारखाच खेळतोय. त्याची फटक्यांची निवडही उच्चस्तरीय असल्याचे काwतुक करत, मी जर निवड समिती अध्यक्ष असतो तर त्याला हिंदुस्थानी संघात निवडले असते, असेही श्रीकांत म्हणाले.