इशान किशनला धक्का; आकाश दीपलाही विश्रांती

पूर्व विभागाचा यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशनला इंग्लिश काऊंटी क्रिकेटदरम्यान झालेल्या दुखापतीमुळे दुलीप करंडकाच्या पहिल्या सामन्यातून बाहेर काढण्यात आहे. त्याच्या जागी ओडिशाच्या आशीर्वाद स्वाइनचा समावेश करण्यात आला आहे.

किशनची दुखापत गंभीर नसली तरी बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये तो पुनर्वसन करत आहे आणि पुढील महिन्यातील हिंदुस्थान ‘अ’च्या मालिकेसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. दरम्यान, वेगवान गोलंदाज आकाश दीपलाही विश्रांतीचा सल्ला देण्यात आला असून त्याच्या जागी आसामच्या मुख्तार हुसेनचा समावेश झाला आहे. पूर्व विभागाचा पहिला सामना शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील उत्तर विभागाविरुद्ध सोमवारपासून सुरू झाला आहे.