खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रातील विसर्ग वाढवणार; नदीकाठच्या परिसराला सतर्कतेचा इशारा

राज्यात दोन दिवसापासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. पुणे शहर आणि जिल्हातही पावसाची दमदार बँटिंग सुरू आहे. या मुसळधार पावसाने अनेक धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. पुण्यातील खडकवासला धरणातही पाणीसाठ्यात वाढ झाल्याने विसर्ग वाढवण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या परिसरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

खडकवासला धरण १९ ऑगस्ट २५ खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा 19334 क्युसेक वाढवून दुपारी 4.00 वा. 24827 क्यूसेक करण्यात येणार आहे. आवश्यकतेनुसार त्यात बदल संभवू शकतो. नदीकाठच्या नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.