
>> कर्नल अभय बाळकृष्ण पटवर्धन (निवृत्त)
पाकिस्तानचे फिल्ड मार्शल असीम मुनीर आणि चीन एक संभाव्य धोकादायक नवीन आघाडी निर्माण करायच्या मार्गावर आहेत.आणि भारत तेल व हत्यार घेऊन रशियाला आर्थिक मदत करतो आहे असा दावा करून अमेरिकाही त्यांना छद्मी मदत करत आहे असे म्हटल्यास ते चूक होणार नाही. दक्षिण आशियातील बदलत्या धोरणाच्या केंद्रस्थानी पाकिस्तानी लष्करप्रमुख आणि देशाचे प्रत्यक्ष शासक, फील्ड मार्शल असीम मुनीर आहेत. अमेरिकेच्या नव्या पाठिंब्यामुळे प्रोत्साहित झालेले आणि बदलत्या भू-राजकीय प्रवाहांमुळे बळ मिळालेले मुनीर भारताविरोधात नवीन रणनीतीचे मायाजाल विणत आहेत.
रशिया आणि चीन/अमेरिकेच्या छद्म आणि प्रकट (कोव्हर्ट अँड ओव्हर्ट) मदतीने पाक सेनाध्यक्ष फील्ड मार्शल असीम मुनीर, भारताविरुद्ध बहुस्तरीय, बहुमुखी रणनीती आखत आहेत. त्यामुळे दक्षिण आशियातील दोन अण्वस्त्रधारी देशांमध्ये सामरिक तणाव वृद्धिंगत होत आहे. तसेही स्वातंत्र्य मिळाल्यापासूनच पाकिस्तान आधी अमेरिका, नंतर रशिया आणि आता यांच्या पाठिंब्यावरच भारतविरोधी अभियान चालवतो आहे. अमेरिका,चीन व रशिया आणि पाकिस्तानमधील घसटीचा गोषवारा वाचल्यावर असीम मुनीरची वाटचाल कोणत्या दिशेने सुरू आहे याची कल्पना करता येते.
अमेरिका आणि पाकिस्तानमध्ये 1953 पासूनच घनिष्ठ, सामारिक व आर्थिक संबंध आहेत. शस्त्रसंधीचे पालन करवण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघातर्फे नियुक्त भारतीय शांती सेनेने 1953 मध्ये कोरियात अमेरिकेला झुकते माप देण्यास नकार दिला होता. त्याच सुमारास अमेरिकेला रशियाविरोधात भारतीय भूमीचा वापर करण्याची परवानगी भारत सरकारने नाकारली होती, जी त्या वेळी पाकिस्तानने दिली होती. तेव्हापासूनच अमेरिकेने पाकिस्तानला झुकते माप देणे सुरू केले ते आजही चालूच आहे. 1965 मध्ये जनरल अयुब खानला पॅटन टँक आणि ‘एफ 4’ विमाने दिली.
1971मध्ये पूर्व पाकिस्तानमध्ये हस्तक्षेप करण्यासाठी आण्विक पाणबुडय़ा पाठवल्या. 1978-80 दरम्यान अफगाणिस्तानमधील मुजाहिदींना देण्यासाठी पाकिस्तानला भक्कम मदत केली. 1984 मध्ये स्वतंत्र खलिस्तान निर्मितीसाठी अमृतसरवर हल्ला करण्यासाठी पाकिस्तानला उद्युक्त केले. 1998 च्या अणुस्फोटाच्या वेळी भारतावर जेवढी बंधने टाकली तेवढी पाकिस्तानवर टाकली नाहीत. 1999मध्ये कारगील क्षेत्रातील एलओसी पार करायची नाही यासाठी भारतावर दबाव आणला आणि आता असीम मुनीरच्या भारतविरोधी धोरण समर्थनार्थ अमेरिकेने सर्व द्वारे खुली केली आहेत. नव्या अमेरिकन ट्रेड टॅरिफ पॉलिसीअंतर्गत पाकिस्तानवर काहीच नाही तर दक्षिण आशियातील देशांवर अमेरिकेने जास्तीत जास्त 20 टक्के आणि भारतावर मात्र 50 टक्के कर लावले आहेत. त्यामुळे भारताच्या आर्थिक व्यवस्थेला जबर हादरा बसेल. या अमेरिकन पृत्याला भारताने ‘अनफॉर्च्युनेट, अनरिझनेबल अँड अनजस्टिफाईड’ करार देऊन आर्थिक स्थितीवर त्याचा परिणाम होऊ देणार नाही याची ग्वाही दिली आहे.
ट्रम्प यांनी पाकिस्तानच्या बाबतीत कोलांट उडी मारली आहे.आपल्या पहिल्या कार्यकाळात ट्रम्प सतत पाकविरोधी वक्तव्ये करत असत. ‘‘त्यांनी आम्हाला खोटेपणा आणि फसवणुकीशिवाय काहीही दिलेले नाही. एवढेच नाही, तर अफगाणिस्तानसंदर्भात ‘ऑपरेशन सायक्लोन’ राबवताना त्यांनी आमच्या नेत्यांना मूर्खात काढले. ‘‘आम्ही ज्या दहशतवाद्यांचा शोध घेतो त्यांना हे सुरक्षित आश्रय देतात. हे आता चालणार नाही, यापुढे कधीच नाही’’ या शब्दांमध्ये आपल्या पहिल्या कार्यकाळात ट्रम्प यांनी पाकिस्तानची भलावण केली होती. आता तेच ट्रम्प या महिन्याच्या शेवटी फील्ड मार्शल असीम मुनीरसाठी पायघडय़ा घालतील. मुनीर परत एकदा अमेरिका भेटीवर जाणार आहेत. अमेरिका- पाकिस्तान व्यापार करारानंतर होणाऱया या भेटीत पाकिस्तानला फक्त प्राधान्य शुल्क दर आकारणे आणि तेथील तेल साठय़ांचा शोध घेण्यास मदत करणे या मुद्दय़ांवर हस्ताक्षरे होतील.
चीनशी पाकिस्तानची घसट 1963 पासून सुरू होऊन आजमितीला दोघेही ‘ऑल वेदर फ्रेंड्स अॅट एनी का@स्ट’पर्यंत आली आहे. 1962 मध्ये चीनने भारताचा पराजय केल्यानंतर ‘भारताचा शत्रू तो माझा मित्र’ या नीतीनुसार चीनशी मैत्री करण्यासाठी पाकिस्तानने पाक ऑक्युपाईड कश्मीरच्या (पीओके) गिलगिट बाल्टिस्तान क्षेत्रामधला 6500 वर्ग मैलांचा काराकोरम ट्रक्ट ‘हलवायाच्या घरावर तुळशीपत्र’ या म्हणीनुसार चीनला आंदण म्हणून देऊन टाकला. 1965 व 71 च्या भारत-पाक युद्धाच्या वेळी रशियाच्या दटावणीमुळे चीनने उत्तर सीमा शांतच राखली. अमेरिकन राष्ट्रपती रिचर्ड निक्सन यांचे सल्लागार हेन्री केसिंगर यांच्या चीन भेटीसाठी 1971 मध्ये पाकिस्तानने पूर्ण सहकार्य केले होते. चीनच्या ‘बॉर्डर रोड इनिशिएटिव्ह’ प्रकल्पात सामील होणाऱया देशांमध्ये पाकिस्तान अग्रणी होता. ‘चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर’ प्रकल्पाला मान्यता देऊन ग्वादार बंदर आणि एअरपोर्ट चीनच्या हवाली करणाराही पाकिस्तानच होता. चीनकडून असंख्य क्षेपणास्त्रs, विमाने, लढाऊ जहाज, ड्रोन्स आणि शस्त्रास्त्रs घेणाराही पाकिस्तानच होता. फील्ड मार्शल बनल्यावर असीम मुनीर पहिले चीनमध्ये आणि नंतर अमेरिकेला गेले होते.
रशिया आणि पाकिस्तानची जवळीक 1965च्या भारत-पाक युद्धानंतर रशियाने घडवून आणलेल्या शस्त्रसंधीच्या वेळी उघड झाली होती. मात्र जुलै 1971मध्ये ‘भारत-रशिया वीस वर्षीय मैत्री करार’ अमलात आल्यावर रशियाने पाकिस्तानला भाव देणे थांबवले होते, पण जेव्हा भारत पाश्चिमात्य देश आणि नंतर अमेरिकेकडे झुपू लागल्यावर ‘संरक्षण सहकार्य करार, 2014’अंतर्गत रशिया आणि पाकिस्तानदरम्यान संरक्षण व सुरक्षा सहकार्य वाढत गेले. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये ‘ऑपरेशन द्रुजबा’ नावाने संयुक्त लष्करी युद्धाभ्यास/ सराव सुरू झालेत.सूत्रांनुसार या वर्षीच्या युद्धाभ्यासासाठी असीम मुनीर हजर राहणार असल्याची आणि ते पाक सेनाध्यक्ष झाल्यापासून रशियात पाक भाडोत्री सैनिक कार्यरत आहेत अशी वंदता आहे, पण याची अधिकारिक पुष्टी होऊ शकली नाही. युव्रेन युद्धाच्या सुरवातीला सेनाध्यक्ष जनरल मुनीर रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्या भेटीला रशियात गेले होते. भारत पाकिस्तानकडून होणाऱया जिहादी दहशतवादाचा सामना करत असल्यामुळे रशिया आणि पाकिस्तानमधील वाढते सामरिक संबंध भारतासाठी महत्त्वाचे आहेत.
जुलै 2025 मध्ये राष्ट्रपती ट्रम्प यांच्याबरोबर झालेल्या मध्यान्न भोजनानंतर असीम मुनीर यांची वट मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. त्यातच अमेरिकेने पाकिस्तानला परत एकदा शस्त्रास्त्रs व आर्थिक मदत देण्याला मान्यता दिली आहे. अमेरिकेच्या नव्या पाठिंब्यामुळे सोकावलेल्या पाकिस्तान व बांगलादेशने भारताच्या ईशान्येकडील भागांमध्ये हस्तक्षेप करायचे धोरण अवलंबणे सुरू केले आहे. या धोरणांतर्गत भारताच्या पूर्वेकडून सुरुवात करून आत खोलवर प्रगतीशील हल्ला (स्टार्ट फ्रॉम ईस्ट अँड गो फॉर प्रोग्रेसिव्ह डीप स्ट्राइक) होण्याची शक्यता आहे.यात त्याला उत्तरेकडून डोकलाम क्षेत्रातून सिलिगुडी का@रिडॉरकडे येणारा (चिकन नेक) चीन आणि त्याच का@रिडॉरकडे दक्षिणेकडून येणारा बांगलादेश यांच्या द्वयीला तोंड द्यावे लागेल. पश्चिमेकडून पाकिस्तानही कश्मीर व पंजाबवर हल्ला करेल. त्याचे स्लीपर सेल्स आत धार्मिक संघर्ष सुरू करतील आणि चीन समर्थित नक्सली त्यांना अराजक फैलावण्यात मदत करतील. दीर्घकालीन सीमा आणि ऐतिहासिक शत्रुत्वाची सवय असलेल्या या प्रदेशात असीम मुनीर आणि चीन एक संभाव्य धोकादायक नवीन आघाडी निर्माण करायच्या मार्गावर आहेत. आणि भारत तेल व हत्यार घेऊन रशियाला आर्थिक मदत करतो आहे असा दावा करून अमेरिकाही त्यांना छद्मी मदत करत आहे असे म्हटल्यास ते चूक होणार नाही. दक्षिण आशियातील बदलत्या धोरणाच्या पेंद्रस्थानी पाकिस्तानी लष्करप्रमुख आणि देशाचे प्रत्यक्ष शासक, फील्ड मार्शल असीम मुनीर आहेत. अमेरिकेच्या नव्या पाठिंब्यामुळे प्रोत्साहित झालेले आणि बदलत्या भू-राजकीय प्रवाहांमुळे बळ मिळालेले मुनीर भारताविरोधात नवीन रणनीतीचे मायाजाल विणत आहेत.