
गेले काही दिवस रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणे तुडुंब भरून वाहत आहेत.जिल्ह्यातील 32 धरणे 100 टक्के भरली आहेत. 7 धरणांमध्ये 75 टक्क्याहून अधिक पाणीसाठा आहे. 6 धरणांमध्ये 50 टक्क्याहून अधिक पाणीसाठा आहे. मृद व जलसंधारण विभागातील 16 धरणांमध्ये 100 टक्के पाणीसाठा आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली होती.दरम्यान धरणातील पाणीसाठ्यात कमालीची वाढ झाली आहे.जिल्ह्यातील पणदेरी, तिडे, शिरसाडी, सोंडेंघर, आवाशी, पंचनदी, शिरवली, कोंडीवली, गुहागर, पिंपर, फणसवाडी, मालघर, अडरे, खोपड, मोरवणे, आंबतखोल, असुर्डे, तेलेवाडी, कडवई, रांगव, शीळ, शिपोशी, व्हेळ, गवाणे, झापडे, बेणी, अर्जुना मध्यम प्रकल्प, बारेवाडी आणि चिंचवाडी हि सर्व धरणे 100 टक्के भरली आहेत.भोळवली, नातूवाडी मध्यम प्रकल्प, शेलारवाडी, गडनदी, ओझर, कोंड्ये आणि काकेवाडी हि धरणे 75 टक्क्याहून अधिक भरली आहेत.टांगर, पिंपळवाडी, तळवट, साखरपा, निवे आणि गडगडी हि धरणे 50 टक्क्यांवरून अधिक भरली आहेत.कळवंडे, पन्हळे, बेर्डेवाडी आणि तळवडे हि धरणात आजही 50 टक्क्याहून कमी पाणीसाठा आहे.
मृग व जलसंधारण प्रकल्पात 16 धरणे 100टक्के भरली आहेत.त्यामध्ये चिंचाळी, तुळशी, सुकोंडी, शैलडी, शिवतर, कोसबी, मोर्डे, हर्दखळे, इंदवटी, किंवा, कोडगे, कुरंग, गोपाळवाडी, जुवाठी, वाटूळ, रेवली हि धरणे १०० टक्के भरली आहेत, कुरवळ, कशेळी आणि परूळे हि धरणे ७५ टक्क्याहून अधिक भरली आहेत.तिवरे, राजेवाडी आणि कोंडवाडी या धरणात ५० टक्क्याहून कमी पाणीसाठा आहे.