
घटनेच्या तब्बल 18 वर्षांनंतर बलात्काराचा गुन्हा नोंदवणाया महिलेच्या तक्रारीवर संशय व्यक्त करत उच्च न्यायालयाने हा गुन्हा रद्द केला.
पुणे येथील 69 वर्षीय प्रेमसुख कटारीया यांनी हा गुन्हा रद्द करण्यासाठी याचिका केली होती. माझे चारित्र्य मलिन करण्यासाठी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला, असा दावा कटारीया यांनी केला. तो ग्राह्य धरत न्या. अजय गडकरी व न्या. राजेश पाटील यांच्या खंडपीठाने ही याचिका मंजूर केली. एकाच वेळी दोन आरोप करणे अयोग्य आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.
काय आहे प्रकरण
लग्नाचे आमिष दाखवून कटारीया 1996 पासून अत्याचार करत आहेत. त्यांच्यापासून मला एक मुलगी आहे. ते मला जातीवरुन हिणवतात, असा आरोप करत पीडित महिलेने पोलिसात याची 2014 मध्ये तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी याचा गुन्हा नोंदवला. हा गुन्हा रद्द करण्यासाठी कटारीया यांनी न्यायालयाचे दार ठोठावले होते.