
बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी गया येथे येणार आहे. यावरून माजी मुख्यमंत्री आणि आरजेडीचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर तिखट शब्दात हल्ला चढवला आहे. नितीश कुमार यांच्या राजकारणाचं पिंडदान करण्यासाठी मोदी गयामध्ये येत आहेत, अशी टीका लालू प्रसाद यादव यांनी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बिहार आणि पश्चिम बंगालचा दौऱ्यावर जाणार आहेत. बिहारमध्ये अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन मोदी करणार आहेत. मोदींच्या हस्ते गया येथे 13 हजार कोटींच्या अधिक विकास कामांचे उद्घाटन होणार आहे. यावेळी नितीश कुमारही मोदींच्या सोबत असणार आहे. आता मोदींच्या या दौऱ्यावर लालू प्रसाद यादव यांनी खरपूस शब्दात टीका केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गयामध्ये नितीश कुमार यांच्या राजकारणाचे आणि त्यांच्या पक्षाचे पिंडदान करायला येत आहेत, अशी पोस्ट लालू प्रसाद यादव यांनी एक्सवर केली आहे. यासोबत त्यांनी व्हिडीओही जारी केला आहे. मोदी गया येथे येत आहेत, तर त्यांनी बिहारला विशेष दर्जा न देण्याच्या त्यांच्या हट्टीपणाचेही पिंडदान करावे. बिहामधील गरीब आणि दलितांना मतदानाच्या हक्कापासून वंचित ठेवणाऱ्या त्यांच्या विचारसरणीचेही त्यांनी पिंडदान करावे, असे यात म्हटले आहे.
प्रधानमंत्री मोदी जी आज गया में नीतीश कुमार की राजनीति और उनकी पार्टी का पिंडदान करने आ रहे हैं। #Bihar #RJD #TejashwiYadav pic.twitter.com/dTBatRgeAU
— Lalu Prasad Yadav (@laluprasadrjd) August 22, 2025
दरम्यान, बिहारमधील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही मोदींच्या दौऱ्यावर हल्लाबोल केला आहे. गयामध्ये आज खोटेपणा आणि घोषणांचे दुकान उभारले जाईल. गयामध्ये मोदी खोटेपणा आणि घोषणांचा हिमालय उभा रकतील, पण बिहारचे न्यायप्रेमी लोक दशरथ मांझीप्रमाणे त्यांच्या खोटेपणाचे डोंगर फोडतील, असा हल्लाबोल तेजस्वी यादव यांनी केला.