पंजाब अँड सिंध बँकेत 750 पदांसाठी भरती

पंजाब अँड सिंध बँकेत लोकल बँक ऑफिसर पदांच्या 750 पदांसाठी भरती आयोजित करण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. अर्ज भरण्याची अखेरची मुदत 4 सप्टेंबर 2025 पर्यंत आहे. ही भरती प्रक्रिया अनेक राज्यात राबवली जाणार असून महाराष्ट्रात 100 जागा भरल्या जाणार आहेत. आंध्र प्रदेश 80, छत्तीसगड 40, गुजरात 100, हिमाचल प्रदेश 30, झारखंड 35, कर्नाटक 65, ओडिशा 85, तामीळनाडू 85, तेलंगणा 50 जागा भरल्या जाणार आहेत.