
तामीळनाडू येथील फॉक्सकॉनची सहायक कंपनी युजहान टेक्नोलॉजीमधून 300 इंजिनीअर्स अचानक मायदेशी परतले आहेत. चिनी कंपनीने आपल्या 300 इंजिनीअर्सना चीनमध्ये बोलावले असल्याने हिंदुस्थानातील अॅपलच्या प्रोडक्ट्सवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. हिंदुस्थान आणि चीन या दोन देशांमधील संबंध हळूहळू सुधारत असताना अचानक चीनने आपल्या इंजिनीअर्सना माघारी बोलावल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. याआधीही चीनने आयफोन युनिटमधून 300 चिनी इंजिनीअर्सना माघारी बोलावले होते. चीनने इंजिनीअर्स माघारी बोलावल्याने तामीळनाडू आणि कर्नाटकच्या युनिटमधील आयपोन 17 च्या प्रोडक्ट्सवर परिणाम होण्याची शक्यता आहे. चीनने आणखी 60 इंजिनीअर्सना पाठवणेही रोखले आहे.