
अॅपल कंपनी आपली आगामी आयफोन 17 सीरिज पुढील महिन्यात लाँच करणार आहे. आयफोन 17 सीरिज लाँचिंगची तारीख कंपनीने चुकून लीक केल्याची माहिती आता समोर आली आहे. अॅपलने चुकून अॅपल टीव्ही अॅपवर 9 सप्टेंबरला इव्हेंट होणाऱ्या इव्हेंटचे निमंत्रण पोस्ट केले. परंतु हे उघड होताच कंपनीने तत्काळ इव्हेंटच्या निमंत्रणाचे पोस्ट हटवले आहे. कंपनी आपल्या आयफोन 17 सीरिजमध्ये चार फोन लाँच करणार आहे. या फोनमध्ये आयफोन 17, आयफोन 17 एअर, आयफोन 17 प्रो आणि आयफोन 17 प्रो मॅक्स हे चार फोन लाँच करणार आहे. आयफोन 17 एअरची किंमत 949 डॉलर म्हणजेच हिंदुस्थानात 94 हजार 900 रुपये तर आयफोन 17 प्रोची किंमत 1 लाख 21 हजार 900 रुपये असू शकते.