
उद्योगपती मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी यांच्या मातोश्री कोकिलाबेन अंबानी यांची प्रकृती बिघडली असून त्यांना एच. एन. रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्या 91 वर्षांच्या आहेत. दरम्यान, अद्याप रिलायन्स किंवा अंबानी कुटुंबाकडून याबाबत कुठलीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.