मोदी, पुतिन, जिनपिंग, शरीफ एकाच मंचावर; शांघाय सहकार्य संघटनेची 31 ऑगस्टला बैठक

शांघाय सहकार्य संघटनेची आतापर्यंतची सर्वात मोठी बैठक 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी चीनमधील तिआंजिन येथे होत आहे. या बैठकीदरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ एकाच मंचावर दिसणार आहेत.  चीनचे परराष्ट्रमंत्री लिऊ बिन यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना याबाबतची माहिती दिली.