निवडक वेचक – संसद परिसरात दुसर्‍यांदा संशयित पकडला

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने शनिवारी संसद भवन परिसरात एका २० वर्षीय संशयित तरुणाला ताब्यात घेतले. दोन दिवसात अशा दोन घटना घडल्या. दरम्यान, शुक्रवारी एका व्यक्तीला संसद परिसराची िंभत ओलांडण्याचा प्रयत्न करताना ताब्यात घेण्यात आले होते

दिल्ली मुख्यमंत्री हल्ला; दुसरा आरोपी अटकेत

दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. याआधी अटक झालेला हल्लेखोर राजेश खिमजी याचाच तो मित्र असून तहसीन असे त्याचे नाव आहे. तहसीन हा राजकोटचा रहिवासी आहे.

दिल्लीत ३० कोटींचे अमली पदार्थ जप्त

दिल्लीत सीमा शुल्क विभाग आणि पोलिसांनी तीन तस्करांना गजाआड केले. पहिल्या प्रकरणात दिल्ली विमानतळावर एकाकडे २५ कोटींचा गांजा सापडला, तर दुसर्‍या प्रकरणात दोन महिला ड्रग तस्करांना पाच कोटींच्या ड्रग्जसह पकडण्यात आले.

पाकिस्तानात मुसळधार पावसामुळे हाहाकार

पाकिस्तानात खैबर पख्तुन्ख्वा प्रांतात मुसळधार पावसाने अक्षरश: हाहाकार माजवला आहे. ढगफुटीसारखा पाऊस झाल्याने महापूर आला आहे. या महापुरात आणि भुस्खलनाच्या घटनांमध्ये ११ जणांचा मृत्यू झाला आहे.

इस्रो १०० हून अधिक उपग्रह सोडणार

पुढच्या १५ वर्षांत तब्बल १००हून अधिक उपग्रहांचे इस्रो प्रक्षेपण करणार आहे, अशी माहिती केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र िंसह यांनी दिली आहे. २०४०पर्यंतचा अंतराळ मोहिमांचा रोडमॅप तयार असल्याचेही ते म्हणाले.

पाकिस्तानी विमानांसाठी २४ सप्टेंबरपर्यंत नो एण्ट्री

पाकिस्तानी विमान कंपन्यांना हिंदुस्थानी हवाई क्षेत्रात २४ सप्टेंबरपर्यंत बंदी जाहीर करण्यात आली आहे. सलग पाचव्या महिन्यातही हिंदुस्थानने पाकिस्तानला दणका दिला आहे. पाकिस्तानने दोन दिवसांपूर्वी विमान कंपन्यांसाठीची बंदी वाढवली होती.