मुंबई विभाग क्रमांक ९ मधील शिवसेना पदाधिकारी जाहीर

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने मुंबई विभाग  क्रमांक ९ मधील शिवसेना पदाधिकार्‍यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत, शाखा क्रमांक १७३ च्या शाखा संघटकपदी वासंती दगडे तर शाखा समन्वयकपदी पूजा कस्पले यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळवण्यात आली आहे.