गणपती बाप्पा मोरया 2025 – लाडक्या बाप्पासाठी बनवून बघा सर्वात सोपे आरोग्यासाठी उत्तम मावा मोदक, वाचा

सण आणि समारंभ म्हटल्यावर घरात गोडा धोडाचे पदार्थ होणारच. त्यात आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन आता अवघ्या काही तासांमध्येच होईल. बाप्पाचे आगमन होताच, आपण सर्वजण बाप्पाच्या स्वागताची तयारी करतो. यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे बाप्पाला आवडणारा मोदकाचा नैवेद्य. मोदक हा एक असा प्रकार आहे जो घरातील लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनाच आवडतो.

मोदकाचे विविध प्रकार आपण आपल्या आवडीप्रमाणे घरी बनवू शकतो. दुधाच्या खव्यापासून/ माव्यापासून सुद्धा आपण मोदक बनवू शकतो. हा मोदक केवळ जिभेसाठी उत्तम नाही तर आपल्या शरीरासाठी सुद्धा खोया / मावा तितकाच उपयुक्त आहे. जाणून घेऊ मोदकाची रेसिपी आणि खोया/ मावा खाण्याचे फायदे.

गणपती बाप्पा मोरया 2025 – उकडीचे मोदक खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे जाणून तुम्हीही थक्क व्हाल, वाचा

मावा मोदक

साहित्य – पाव किलो मावा, ८५ ग्रॅम बारीक साखर, १ चमचा वेलची पूड ,केशराच्या कांड्या किंवा केशरी रंग

सारण- या मोदकाचे सारण हे ड्रायफ्रूटचे करावे. म्हणून मोदकात भरण्यासाठी काजू, बदाम, पिस्ता पूड, बेदाणे घ्यावे.

कृती : – हलवायाच्या दुकानातून दाणेदार मावा घरी आणावा.

हा मावा हाताने आधी चांगला मळून घ्यावा.

त्यानंतर त्यामध्ये पिठी साखर घालून पुन्हा एकदा मिश्रण व्यवस्थित मिसळून घ्यावी.

कल्हई केलेले पितळेचे पातेले घेवून त्यात मावा घालून मंद गस वर ढवळत राहावे.

माव्याचा व्यवस्थित गोळा होत आल्यावर, नीट बघावे की मावा हाताला चिकटत नाही का हे तपासून बघावे.

मावा चिकटणे बंद झाल्यानंतर, गॅस बंद करावा. पातेले खाली उतरवावे मावा थंड होऊ द्यावा.

थंड झाल्यावर वेलची पावडर घालावी.

हे मोदक चार -पांच तासांनी मोदक वळायला घ्यावे. मोदक वळताना त्यात सारण म्हणून बारीक केलेले ड्रायफ्रूट घालावे.

गणपती बाप्पा मोरया 2025- मऊ लुसलुशीत मोदक करण्यासाठी कोणता तांदूळ सर्वात उत्तम, वाचा

खवा/ मावा खाण्याचे फायदे

मावा किंवा खवा हा दूधापासून बनवला असल्याने, यामध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन बी मुबलक प्रमाणात आढळते.

मावा किंवा खवा खाण्यामुळे आपली हाडे आणि दात मजबूत होतात.

रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते तसेच आपण उर्जावान राहतो.

केसांचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी आपल्या आहारात खवा/मावा समाविष्ट करायला हवा.

उत्तम पचनासाठी खवा हा गरजेचा मानला जातो. खवा खाण्यामुळे बद्धकोष्ठता टाळता येते.

वजन वाढविणाऱ्यांसाठी खवा हा एक उत्तम पर्याय मानला जातो. कारण खव्यामध्ये कॅलरीजचे प्रमाण सर्वाधिक असते.

महत्त्वाची नोंद – खवा/मावा खाताना मर्यादेत खावा. अधिक प्रमाणात खाल्ल्यास त्याचे दुष्परीणाम होऊ शकतात.