
चॉकलेट हा शब्द उच्चारताच प्रत्येकजण खुश होतो. खासकरुन बच्चेकंपनी चॉकलेट हे नाव ऐकताच भानावर राहात नाहीत. आता काही तासातच घरी बाप्पा विराजमान होईल. अशावेळी बाप्पाला आवडणारा मोदक चॉकलेट पासून केला तर घरची ही बच्चेकंपनी नक्कीच खुश होतील की नाही. घरच्या बच्चेकंपनीसह मोठ्यांनाही आवडणारे हे चॉकलेट मोदकांच्या आकारात दिसायलाही भन्नाट दिसेल. चला तर जाणून घेऊया चॉकलेट मोदक करण्याची पद्धत.
गणपती बाप्पा मोरया 2025 – उकडीचे मोदक खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे जाणून तुम्हीही थक्क व्हाल, वाचा
अतिशय झटपट होणारे चॉकलेट मोदक असून याकरता फार साहित्यही लागत नाही. केवळ चॉकलेट, मावा/खोया आणि साखर इतकेच पदार्थ चॉकलेट मोदक करण्यासाठी लागतात. घरी घाईगडबडीच्या वेळेतही ही रेसिपी अगदी पटकन होईल अशीच आहे.
गणपती बाप्पा मोरया 2025 – झटपट होणारे शाही मोदक करा घरच्या घरी, वाचा
चॉकलेट मोदक
चॉकलेट मोदक करण्यासाठी चॉकलेट चिप्स लागतात. तसेच कोणत्याही चांगल्या ब्रँडच्या बेकिंग किंवा कुकिंग चॉकलेटचा वापर केला तरी चालू शकतो.
साहित्य– चॉकलेट चिप्स, खवा, वेलची पावडर, मिल्कमेड, दूध
कृती– एका पॅनमध्ये तूप, मिल्कमेड आणि दूध गरम करा. मंद आचेवर सतत ढवळत राहा, उकळी येईपर्यंत शिजवा.
मिश्रण गरम करत राहावे. त्यानंतर त्यामध्ये कोको आणि कॉर्नफ्लोअर थोड्या पाण्यात मिसळून पेस्ट बनवा आणि मिश्रणात घाला.
मिश्रण पॅनच्या बाजूंपासून वेगळे होईपर्यंत मध्यम आचेवर शिजवत रहा.
थोडे थंड झाल्यावर मोदकांचा आकार द्यावा.
गणपती बाप्पा मोरया 2025- बाप्पाच्या नैवेद्यासाठी साधे सोपे न फुटणारे मऊ लुसलुशीत उकडीचे मोदक
महत्त्वाची टिप – चॉकलेट मोदक खोलीच्या तपमानावर काही तास थंड होऊ द्या किंवा लवकर स्थिर होण्यासाठी रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा.