५० टक्के टॅरिफची अंमलबजावणी सुरू; हिंदुस्थानच्या ५ लाख कोटींच्या निर्यातीला फटका, अमेरिकेत दागिने, हिरे, कपडे, सी-फूड, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची मागणी ७० टक्क्यांनी घटणार

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘टॅरिॅफ वॉर’चा मोठा फटका हिंदुस्थानला बसणार आहे. -िहंदुस्थानातून अमेरिकेत पाठवल्या जाणार्‍या वस्तूंवर आजपासून तब्बल ५० टक्के कर लागू झाला आहे. या करामुळे हिंदुस्थानच्या सुमारे ५.४ लाख कोटी रुपयांच्या निर्यातीवर परिणाम होईल. तसेच ५० टक्के टॅरिफमुळे अमेरिकेत विकले जाणारे कपडे, दागिने, हिरे, इलेक्ट्रॉनिक वस्तू, फर्निचर, सी-फूड या हिंदुस्थानी उत्पादनाचा खर्च वाढेल. परिणामी वस्तू महाग झाल्यामुळे त्यांची मागणी ७० टक्क्यांनी कमी होण्याची भीती आहे.

रशियाकडून हिंदुस्थान तेल आयात करतो म्हणून राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी २५ टक्के अतिरिक्त कर लादण्याची अधिसूचना मंगळवारी रात्री जारी केली. त्यामुळे हिंदुस्थानातून अमेरिकेत निर्यात होणार्‍या वस्तूंवर आता एकूण ५० टक्के कर अंमलबजावणी सुरू झाली आहे. यासंदर्भात ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्ह (जीटीआरएस) ने अहवाल तयार केला आहे. ट्रम्प यांच्या या टॅरिफ वॉरचा मोठा फटका हिंदुस्थानला बसणार, असे यात स्पष्टपणे म्हटले आहे.

हिंदुस्थानातून ७.५९ लाख कोटींची निर्यात

  • २०२४च्या आकडेवारीनुसार हिंदुस्थानातून अमेरिकेला ७.५९ लाख कोटी रुपये किंमतीच्या वस्तुंची निर्यात होते.
  • या निर्यातीमध्ये प्रामुख्याने हिंदुस्थानी यंत्रसामग्री १.६८ लाख कोटी, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, आयफोन १.२८ लाख कोटी, औषधे व फार्मा ०.९२ लाख कोटी, हिरे व दागिने ०.८७ लाख कोटी, कपडे ०.८२ लाख कोटी, रसायने ०.३७ लाख कोटी, पेट्रोलियम उत्पादने ०.३६ लाख कोटी, ऑटो पार्ट, मसाले, मातीची भांडी, प्लास्टिक, चामडे, तांदुळ, तंबाखू १.२९ लाख कोटी.

रोजगारावर परिणाम होणार

हिंदुस्थानातील वस्तूंवर जास्त टॅरिफ लावल्यामुळे अमेरिकेत त्या वस्तूंचे दर भडकणार. महागाई वाढल्यामुळे वस्तूंची मागणी कमी होणार. पर्यायाने हिंदुस्थानात उत्पादनही कमी होईल. त्याचा परिणाम रोजगारावर होण्याची भीती आहे. हिंदुस्थान अमेरिकेला दरवर्षी ६० हजार कोटी रुपये किंमतीचे सी-फूड निर्यात करते. हे क्षेत्र सुमारे दोन कोटी हिंदुस्थानी नागरिकांना रोजगार देते. त्याप्रमाणेच इलेक्ट्रॉनिक्स, कापड नि-िर्मती, फार्मा या कंपन्यांच्या रोजगारावर परिणाम होऊ शकतो.