सोनू सूदने 8.19 कोटींना विकला फ्लॅट

बॉलीवूड अभिनेता सोनू सूदने मुंबईतील महालक्ष्मी येथील आपला लक्झरी फ्लॅट 8.10 कोटी रुपयांना विकला आहे. हा फ्लॅट 1247 फुटांचा असून सोनू सूदने 2012 मध्ये या फ्लॅटला 5.16 कोटी रुपयांना खरेदी केले होते. त्यामुळे 13 वर्षांत 2.94 कोटी रुपयांचा फायदा झाला आहे. या फ्लॅटमध्ये दोन कार पार्किंगसुद्धा आहेत. या फ्लॅटच्या खरेदी-विक्रीसाठी 48.60 लाख रुपयांची स्टँप ड्युटी आणि 30 हजार रुपयांची नोंदणी फी मोजण्यात आली आहे.