
आयफोन 17 सीरिजच्या लाँचिंगची आयफोन चाहत्यांना प्रचंड उत्सुकता लागली असताना अॅपल कंपनीने अखेर या सीरिजच्या लाँचिंगचे निमंत्रण पाठवणे सुरू केले आहे. कॅलिफोर्नियाच्या क्युपर्टिनो येथील अॅपल पार्कमध्ये 9 सप्टेंबरला आयोजित केल्या जाणाऱ्या ऑ-ड्रॉपिंग इव्हेंटची कंपनीने घोषणा केली आहे. आयफोन 17 सीरिज हिंदुस्थानी वेळेनुसार, रात्री साडे दहाच्या सुमारास सुरू होईल. अॅपल कंपनी या सीरिज अंतर्गत एकूण चार आयफोन लाँच करणार आहे. या फोनमध्ये आयफोन 17, आयफोन 17 प्रो, आयफोन 17 प्रो मॅक्स आणि आयफोन 17 एअर या चार फोनचा समावेश आहे.
आयफोन 17 प्रो मॅक्सची फिचर्स
आयफोन 17 प्रो मॅक्समध्ये 6.8 इंचाचा एक्सडीआर ओलेड स्क्रीन दिली जाऊ शकते. याचा रिफ्रेश रेट 120 हर्टझ् असेल. फोनमध्ये अॅपल ए 19 प्रो चिपसेट दिली जाणार आहे. फोनमध्ये 12 जीबीपर्यंत रॅम आणि 256 जीबीपर्यंत स्टोरेज दिले जाऊ शकते. या फोनमध्ये एक नवीन कॅमेरा फिचर्स मिळू शकते. या फोनमध्ये 48 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 48 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल आणि 48 मेगापिक्सलचा पेरिस्कोप टेलिफोटो लेन्स मिळतील. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 24 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो. आयफोन 17 प्रो मॅक्समध्ये आतापर्यंतची सर्वात मोठी 5500 एमएएच क्षमतेची बॅटरी दिली जाऊ शकते. तसेच 25 वॅट मेगासेफ वायरलेस चार्जिंगचा सपोर्ट मिळेल.