
इंडियन प्रीमियर लीगच्या आगामी हंगामापूर्वी राजस्थान रॉयल्समध्ये नाट्यमय घडामोडी घडत आहेत. एकीकडे संजू सॅमसन राजस्थान सोडणार अशी चर्चा सुरू असताना दुसरीकडे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत मोठा बॉम्ब टाकला. राराहुल द्रविड यांनी कार्यकाळ वाढवण्यास नकार दिला असून आगामी हंगामात ते आपल्या संघासोबत नसतील, अशी माहिती राजस्थान रॉयल्सने आपल्या अधिकृत सोशल मिडिया अकाऊंटवरून दिली आहे.
टीम इंडियाला आपल्या मार्गदर्शनाखाली 2024 चा टी-20 वर्ल्डकप जिंकून दिल्यानंतर राहुल द्रविडचे आयपीएलमध्ये पुनरागमन झाले. त्याला आपल्यासोबत घेण्यासाठी अनेक फ्रँचायझी उत्सुक होत्या. अनेकांनी कोरे चेकही त्याच्यासमोर ठेवले होते. मात्र द्रविडने या सर्वांना नकार देत आपला जुना संघ राजस्थान रॉयल्सची निवड केली.
राहुल द्रविडने राजस्थानच्या संघाला वेगळा आयाम मिळवून दिला होता. प्रशिक्षकपद भूषवताना द्रविडने स्वत:चीही पर्वा केली नाही. पायाला दुखापत झालेली असतानाही कुबड्या घेऊन द्रविड मैदानात उतरला आणि नव्या पिढीला मार्गदर्शन केले. मात्र आता त्याने प्रशिक्षकपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे फ्रँचायझीने द्रविडला काही ऑफरही दिली होती, मात्र ती त्याने नाकारल्याचे, अधिकृत निवेदनात म्हटले आहे.
Official Statement pic.twitter.com/qyHYVLVewz
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) August 30, 2025