रेल्वेमध्ये 2865 अप्रेंटिस पदांसाठी भरती

पश्चिम मध्य रेल्वेने जबलपूर, भोपाळ, मध्य प्रदेश, कोटा, राजस्थान येथे अप्रेंटिस पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया आजपासून म्हणजेच 30 ऑगस्टपासून सुरू झाली आहे. वायरमन, वेल्डर, टर्नर, प्लम्बर, मेकॅनिक, अभियंता, फिटर, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन, संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग सहायक या विविध पदांसाठी उमेदवार अर्ज करू शकतात. उमेदवाराकडे आयटीआय पदवी असणे आवश्यक आहे. या भरतीसंबंधी सविस्तर माहिती wcr.indianrailways.gov.in या अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.