सप्टेंबर महिन्यात 15 दिवस बँका बंद

सप्टेंबर महिन्यात देशभरात 15 दिवस बँका बंद राहणार आहेत. या बँका विविध राज्यातील वेगवेगळ्या दिवशी बंद राहणार आहेत. 3 सप्टेंबरला रांचीत कर्मपूजा, 4 सप्टेंबरला कोचीत पहिला ओणम, 5 सप्टेंबरला ईद-ए-मिलाद निमित महाराष्ट्रासह विविध राज्यात सुट्टी, 6 सप्टेंबरला अनंत चतुर्दशी, 7 सप्टेंबरला रविवार, 12 सप्टेंबरला ईद-ए-मिलाद निमित्त जम्मू, श्रीनगर, जयपूरमध्ये सुट्टी. 13 सप्टेंबरला दुसरा शनिवार, 14 सप्टेंबरला रविवार, 21 सप्टेंबरला रविवार, 22 सप्टेंबरला नवरात्रीची स्थापना, 23 सप्टेंबरला महाराजा हरिसिंह जी यांचा जन्मदिवस, 27 सप्टेंबरला चौथा शनिवार, 28 सप्टेंबरला रविवार, 29 सप्टेंबरला महासप्तमी दुर्गापूजा, 30 सप्टेंबरला महाअष्टमी-दुर्गापूजानिमित्ती विविध शहरांत सुट्टी असणार आहे.