डिजिटल पेमेंटमध्ये महाराष्ट्र अव्वल

देशभरात यूपीआयवरून डिजिटल पेमेंट करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ऑगस्ट महिन्यात यूपीआय ट्रान्झॅक्शनची संख्या 20.01 अब्जवर पोहोचली आहे. जुलै महिन्यात ही आकडेवारी 19.47 अब्ज होती. युपीआयवरून पेमेंट करण्यामध्ये महाराष्ट्र राज्य अव्वल क्रमांकावर आहे. महाराष्ट्रात 9.8 टक्के डिजिटल पेमेंट करण्यात आले. कर्नाटकात 5.5 टक्के, उत्तर प्रदेशात 5.3 टक्के डिजिटल पेमेंट करण्यात आले.