
देशभरातील अपघातांचे प्रमाण चिंताजनक असून दर तीन मिनिटांनी देशात एकाचा अपघाती मृत्यू होत असल्याचे समोर आले आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या नव्या अहवालानुसार देशातील अपघातांच्या प्रमाणाचे आकडे धक्कादायक असल्याचे दिसत आहे. 2023मध्ये रस्ते अपघातांचे प्रमाण 4.2 टक्क्यांनी वाढून 4 लाख 80 हजार 583 इतके झाले आहे. दर तासाला 55 अपघात आणि 20 मृत्यू होत आहेत. भरधाव वाहनांमुळेच सर्वाधिक अपघात होत असल्याचे उघड झाले आहे. 2023मध्ये रस्ते अपघातात एकूण 1 लाख 72 हजार 890 लोकांचा मृत्यू झाला.