
लोकमान्य नगर परिसरातील ज्येष्ठ निष्ठावंत शिवसैनिक आणि शिवसेनेचे समन्वयक सुनील वाडेकर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, दोन भाऊ, बहीण आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर वागळे इस्टेट येथील वैकुंठभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.