
‘दक्षिण मुंबईचा महागणपती’ अर्थात पहिली खत्तरगल्ली सार्वजनिक मंडळ हे गिरगावातील नावाजलेल्या गणपती मंडळांपैकी एक आहे. 1965 साली या मंडळाची स्थापना झाली असून गेली 60 वर्षे पर्यावरणपूरक शाडूच्या मातीपासून 8 फूट ते 14 फुटांची मूर्ती साकारणारे एकमेव मंडळ. मंडळाचे वैशिष्टय़ म्हणजे गेली 60 वर्षे वाडीतील आबालवृद्ध गणेशाची मूर्ती घडविण्यात आपला हातभार लावतात. आजपर्यंत मंडळाला अनेक गणेशमूर्ती स्पर्धांमध्ये पारितोषिके मिळाली आहेत. मंडळातर्फे गेली सलग 23 वर्षे रक्तदान शिबीर, रुग्णांना मोफत घोंगडी वाटप, कोकणातील दुर्गम भागातील गावात मोफत लसीकरण, वृक्षारोपण आदी समाजोपयोगी उपक्रम राबवले जात आहेत.