Who is अबिदुर चौधरी? ज्याने डिझाइन केला आतापर्यंतचा सर्वात स्लीम फोन

अॅपल दरवर्षी आयफोनची एक नवीन सिरीज लाँच करते. वर्षभरापूर्वीच अॅपलने IPhone 16 सिरीज लॉन्च केली. या सिरीजला ग्राहकांचा भरघोस प्रतिसाद मिळाल्यानंतर टिम कुकची कंपनी आयफोन 17 सिरीज घेऊन आली आहे. परंतु यावर्षी 17 सिरीजमधल्या एका मॉडेलने ग्राहकांचे लक्ष वेधून घेतले. ते म्हणजे आयफोन एअर. अॅपलचा आतापर्यंतचा सर्वात स्लीम फोन असल्याने तो चर्चेत आला आहे. या फोनसोबतच चर्चा आहे ती तो फोन बनवणाऱ्याची.

IPhone 17 च्या या नव्या सिरिजमधला लक्षवेदी फोन आयफोन एअर बनवणारा डिझायनर सध्या चर्चेत आहे. अबिदूर चौधरी असे त्याचे नाव आहे. अबिदुर हा टेक जायंट अॅपलचा इंडस्ट्रियल डिझायनर आहे. कंपनीच्या या नव्या आयफोन एअरला काहीतरी वेगळेपणा देण्यासाठी, त्याने तो अतिशय स्लीम आणि टायटॅनियम बॉडीमध्ये डिझाइन केला आहे, यामुळे हा फोन वजनानेही खूप हलका झाला आहे. अ‍ॅपलच्या मागील सर्व मॉडेल्सच्या तुलनेत, या फोनची बॉडी जवळजवळ एक तृतीयांश इतकी स्लीम आहे. त्यामुळे हा फोन सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

अबिदुर चौधरी याने क्यूपर्टिनो लॉन्च कार्यक्रमादरम्यान या फोनबद्दल माहिती दिली. हा फोन म्हणजे एकप्रकारचे कोडे आहे. आणि त्यावर विश्वास ठेवण्यासाठी, तुम्हाला त्या फोनचा अनुभव घ्यावा लागेल, असे त्याने सांगितले. त्यामुळे आयफोन सिरीजमधील सर्वाच भन्नाट फोट बनवणाऱ्य़ा या डिझायनरबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक झाले आहेत.

अबिदुर चौधरी कोण आहे?
अबिदुर याचा जन्म आणि शिक्षण लंडनमध्ये झाले आहे. सध्या तो सॅन फ्रान्सिस्कोमध्ये राहतो. तो येथे डिझायनर म्हणून काम करतो. अबिदुरने लॉफबरो विद्यापीठातून प्रोडक्ट डिझाइन आणि टेक्नॉलॉडीतून पदवी मिळवली. दरम्यान शिक्षण घेत असताना त्याने अनेक पुरस्कार मिळवले. 3D हब्स स्टुडंट ग्रँट, जेम्स डायसन फाउंडेशन बर्सरी, केनवुड अप्लायन्सेस अवॉर्ड असे अनेक पुरस्कार जिंकले आहे. याशिवाय, त्याने सेमोर पॉवेल डिझाइन वीक स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. त्याच्या प्लग अँड प्ले डिझाइनला 2016 मध्ये रेड डॉट डिझाइन अवॉर्ड देण्यात आला होता.

अबिदुर चौधरी याने त्यांच्या कामाची सुरुवात केंब्रिज कन्सल्टंट्स आणि कर्व्हेंटा या यूके कंपन्यांमध्ये इंटर्नशिपने केली. त्यानंतर त्याने लंडनस्थित लेयर डिझाइनमध्ये व्यावसायिक डिझायनर म्हणूनही काम केले. 2018 ते 2019 दरम्यान त्यांनी स्वतःची डिझाईन कन्सल्टन्सी अबिदुर चौधरी डिझाइन या नावाने सुरू केली. या काळात त्यांनी अनेक मोठ्या ब्रँड, डिझाईन स्टुडिओ आणि स्टार्टअप्ससोबत मोठ्या प्रमाणात काम केले

अबिदुर 2019 मध्ये अॅपलमध्ये कार्यरत-
अबिदुर जानेवारी 2019 मध्ये अॅपलमध्ये कार्यरत झाला. येथे त्याने क्युपर्टिनो आणि कॅलिफोर्नियामध्ये इंडस्ट्रिअल डिझायनर म्हणून काम केले. याकाळात अबिदुरने कंपनीसाठी सर्वात मोठ्या आणि महत्तवपूर्ण उत्पादनांवर देखील काम केले, त्यापैकी एक आयफोन एअर आहे. सध्या या फोनची जगभरात चर्चा होत आहे.