शुगर असणाऱ्यांनी बटाट्याऐवजी ‘ही’ भाजी खाणे सर्वात बेस्ट

मधुमेह झाल्यावर आपल्या आरोग्यासाठी धोक्याची घंटा मानली जाते. मधुमेह झाल्यानंतर आपल्यावर अनेक बंधनं येतात. यामध्ये सर्वात महत्त्वाची बंधन हे आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींवर येते. मधुमेहाच्या रुग्णांनी त्यांच्या आहाराची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. मधुमेहींना आहारातून अनेक आवडत्या गोष्टी वगळाव्या लागतात. मग ती भाजी कितीही आवडती असली तरी ती खाणे थांबवावे लागते. अशीच एक भाजी म्हणजे बटाट्याची भाजी. खरं तर बटाट्यांमध्ये भरपूर स्टार्च आणि साधे कार्ब्स असतात, यामुळे रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढते. बटाट्यांऐवजी मधुमेहींनी आहारात कच्चे केळे समाविष्ट करणे सर्वात बेस्ट.

कच्चे केळे खाल्ल्याने आरोग्यासाठी होतील ‘हे’ अद्भुत फायदे

कच्चे केळे हे बटाट्यांसाठी एक चांगला पर्याय आहे. ते बटाट्यांइतकेच चविष्ट असते आणि आरोग्यासाठी देखील चांगले आहे. कच्च्या केळ्यापासून भाज्या, पराठे, भजी, टिक्की इत्यादी बनवू शकतो.

कच्च्या केळ्यामध्ये फायबरचे प्रमाण खूप जास्त असते. ते खाल्ल्याने तुमच्या रक्तातील साखरेची पातळी देखील वाढत नाही. इतकेच नाही तर कच्च्या केळ्यामध्ये प्रतिरोधक स्टार्च असतो. यामुळे आतड्यांमधील चांगल्या बॅक्टेरियांना चालना मिळते.

कच्चे केळे खाल्ल्यामुळे आपले पचन सुधारते. यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो.

पायदुखीवर ‘ही’ तेलं आहेत प्रभावी, मिळेल एका आठवड्यात आराम

कच्ची केळी हृद्याच्या आरोग्यासाठी सुद्धा खूप फायदेशीर असतात. पोटॅशियम आणि उच्च फायबरमुळे कच्ची केळी ही फार महत्त्वाची मानली जातात.

कच्च्या केळ्यामध्ये मॅग्नेशियमचे प्रमाण देखील चांगले असते. स्नायू दुखणे, झोप न लागणे यासारख्या शरीराच्या अनेक कार्यांमध्ये मॅग्नेशियम मदत करते. एकूणच, चव आणि आरोग्याच्या दृष्टीने, कच्चे केळे बटाट्यासाठी एक चांगला पर्याय असू शकते.